Friday, July 23, 2010

यातनाम मराठी उद्योगपती अविनाश भोसले यांनी सिडकोत लिलावात २८७ कोटी रुपयांना एक प्लॉट घेतला होता.

हा प्लॉट हॉटेलसाठी राखीव होता. त्यावेळी नव्या मुंबईत तात्काळ नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार अशी घोषणा केंद्र राज्य सरकारने केली होती.
विमानतळ होणार हे गृहित धरुन ताजपासून सर्व बड्या हॉटेल्सनी टेंडर्स भरली. त्यात सर्वात मोठी बोली अविनाश भोसल्यांची ठरली आणि १२ एकरांचा हा हॉटेलसाठी राखीव प्लॉट त्यांच्या कंपनीला मिळाला.
नंतर नेहमीप्रमाणे घटनाचक्र सुरु झाले. महाराष्ट्रात कुठेही एकदा औद्योगिक प्रकल्प सुरु झाला की ज्याप्रमाणे लग्नाचा मांडव पडला की हिजड्यांच्या टोळ्या खंडणी वसुलीसाठी घिरटया घालू लागतात त्याप्रमाणे स्थानिक गुंड, राजकारणी, पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ब्लॅकमेल करणाèया एन.जी.ओ., स्थानिक भूमिपुत्र शेतकèयांच्या नावाने गळ काढणारे धंदेवाईक कृती समितीवाले यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संकल्पित प्रयोगाला विरोध करायला सुरुवात केली आणि प्रकल्प रखडू लागला.
साहजिकच विशिष्ट टाईम लिमिटमघ्ये विमानतळ मार्गी लागेल, पुरा होईल या अपेक्षेने मॉल, हॉटेल्स, आय.टी. पार्कस, बिझनेस हब्स यासाठी ज्यांनी प्लॉटस मध्ये गुंतवणूक केली होती त्यांची आर्थिक गणिते धोक्यात येउ लागली.
सिडकोला याची जाणीव होती की आपण एअरपोर्ट होणार. लवकरच होणार असे आमीष दाखवून चढ्या qकमतीला प्लॉटस विकले आहेत पण प्रत्यक्षात एअरपोर्टचे बांधकाम तर दूरच राहिले साधे त्या साठीचे भूसंपादनही अजून आपण करु शकलेलो नाही.
त्या अपराधी भावनेपोटी मग सिडकोने ज्यांना प्लॉट विकले आहेत. त्यांनी विमानतळाला होणाèया विलंबाविरुध्द कोर्टाज जाउन आपली अब्रू काढू नये म्हणून नाममात्र शुल्क आकारुन प्लॉटच्या उपयोगात फेरबदल करुन आर्थिक नुकसान टाळण्याचा मार्ग प्लॉटधारकांना खुला करण्याचे ठरवले.
सिडको कडून टेंडर qकवा डायरेक्ट स्पेशल कोटा अ‍ॅलॉटमेंटमधून मिळालेल्या प्लॉटच्या उपयोगाच्या अटी-तरतुदींमध्ये बदल काही प्रथमच आणि फक्त अविनाश भोसल्यांच्या हॉटेलसाठी राखीव प्लॉटमध्ये झाला असे अजिबात नाही.
कमर्शियल साठी राखीव प्लॉटवर रेसिडंशियलला परवानगी आणि रेसींडेशियल मध्ये नंतर कमर्शियलला परवानगी देण्याचे प्रकार सिडकोच्या इतिहासात एक दोन नव्हेत शेकड्यांनी घडले आहेत.
नवी मुंबईत डझनभर वृत्तपत्रांना सिडको ने भूखंड दिले आहेत. हिच वृत्तपत्रे आज अविनाश भोसल्यांनी हॉटेलसाठी राखीव प्लॉटमध्ये अर्धा भाग चेंज ऑफ यूज करुन रेसीडेंशियल करुन विकल्याबद्दल बोंब मारण्यात आघाडीवर आहेत. पण जर एकदा चौकशी आयोग नेमून या डझनभर वृत्तपत्रांनी त्यांना केवळ त्यांच्या उपयोगासाठी प्रेस आणि ऑफिसेससाठी दिलेल्या प्लॉटसमध्ये कसे सिडकोंवर प्रेस पॉवर चा दबाव आणून त्या प्लॉटमध्ये रेसीडेंशियल, कमर्शियल जागा घुसवल्या व त्यासाठी चेंज ऑफ यूज करुन घेतले हे उघडकीस  येईल. ज्यांनी स्वत: मिडीया अ‍ॅक्टीव्हीटी साठी मिळालेल्या प्लॉटमध्ये नफा कमवण्यासाठी बिल्डरना प्लॉटचे हिस्से विकले त्या मिडीया हाउसेसना खरे तर अविनाश भोसले यांनी चेंज ऑफ यूज करुन घेतल्याबद्दल बोंब मारण्याचा नैतिक अधिकारच नाही असे आमचे मत आहे.
अशोक चव्हाणांनी अविनाश भोसल्यांच्या चेंज ऑफ यूजला दिलेली स्थगितीही संशायास्पद आहे.
ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये नवा सिनीयर इन्स्पेक्टर आला की तो आपला रुबाब जमविण्याकरता आणि हप्ता वाढवून घेण्याकरता वैद्य आणि अवैद्य अशा दोन्ही प्रकारच्या धंदेवाल्यांना उपद्रव धमक्या देतो, कायदा ऐकवतो त्याप्रमोण मुख्यमंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री होउन दीड वर्ष झाले तरी अजून कुणा कारखानदाराचे नाक दाब, कुणा बिल्डरला जुलाब दे, कुणा राजकारण्याच्या महत्वाकांक्षेला चाप लाव असे उद्योग करुन स्वत:चे महत्त्व प्रस्थापित करीतच आहेत.
अविनाश भोसले हे विलासराव देशमुखांचे खास मित्र आहेत. अर्थात विलासरावाचा मित्र तो अशोक चव्हाणांसाठी सहाजिकच शत्रू असतो कारण अशोक चव्हाणांचे राज्य खालसा करुन त्यांचे पार्सल नांदेडला परत पाठवण्यातइतके लॉबींग दिल्लीत करु शकणारे एकमेव नेते विलासराव आहेत याची जाणीव अशोकरावांना आहे.
अशोक चव्हाण शरद पवारांना घाबरत नाहीत एवढे विलासरावांना घाबरतात.
२००४ च्या विधानसभाा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सुशिल कुमार शिंदेंनी निवडणुका qजकूनही ज्या पध्दतीने विलासरांवानी त्यांना रिटायर करुन आंध्रच्या राज्यपालपदी पाठवून स्वत: मुख्यमंत्री झाले तो इतिहास त्यांच्या मंत्रीमंडळात असलेले अशोकराव विसरलेले नाहीत. त्यामुळे विलासराव हाच आपल्याला खरा धोका आहे. याबाबत अशोकरावांची खात्री आहे.
विलासराव देशमुखांची खोडी काढण्यासाठी अशोक चव्हाण अविनाश भोसल्यांच्या वाटयाला गेले खरे पण अविनाश भोसले हे फक्त विलासरावांचे मित्र नाहीत. अशोक चव्हाण सोडून सर्व पक्षातल्या जवळ जवळ सर्वच राजाकरण्यांचे ते खास मित्र आहेत.
उध्दव ठाकरे जेव्हा हेलिकॉप्टरने कुठे जातात तेव्हा त्यांच्या दीमतीला असते ते हेलिकॉप्टर एकतर बी.जी. शिर्के कंपनीचे असते qकवा अविनाश भोसले यांचे शिवसेनेच्या निवडणुक निश्चित शिवसेना सत्तेवर नसताना देखील कोट्यावधी रुपयांचे योगदान देणारे उद्योगपती आहेत. अविनाश भोसले म्हणजे अविनाश भोसल्यांविरुध्द कारवाई करुन अशोक चव्हाणांनी आधीपासूनच त्यांच्यावर खारखावून असलेल्या शिवसेनेला थेट अंगावर घेतले आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे मित्र आणि फायनान्सर अविनाश भोसलेच आहेत. नितीन गडकरी जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात होते आणि युती शासनाच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तेव्हा सर्वाधिक कॉट्रॅक्ट्स अविनाश भोसले यांनाच मिळत होते.
पाटबंधारे जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांनी कृष्णाखोèयाची जाहीगीरदारी गेली दहा वर्षे अविनाश भोसले यांनाच प्रदान केली आहे. पवार फॅमीलीचे लवासा पासून सर्व औद्योगिक प्रकल्प अविनाश भोसलेच हाताळतात त्यामुळे अविनाश भोसलेंना त्रास देणे म्हणजे थेट अजितदादा पवारांनाच त्रास देण्यासारखे आहे.
आता राहिले महाराष्ट्रातल्या सर्व राजकारण्यांचे गॉडफादर साक्षात शरद पवार आणि अविनाश भोसले म्हणजे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीथे शरद पवार तीथे अविनाश भोसले हे समिकरण आहे. ज्याप्रमाणे शरद पवारांच्या छत्रछायेखाली बीसीसीआय च्या संमतीने आयपीएलचे गर्वनर ललीत मोदी हे प्रस्थ मोदी निर्माण झाले त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचे अंबानी म्हणून शरद पवारांनी अविनाश भोसले यांची निवड केली.
आज महाराष्ट्रातल्या विविध पक्षांच्या राजकारण्यांचे काही हजार कोटी अविनाश भोसलेंच्या उद्योगात गुंतले आहेत. अविनाश भोसले हे कॉंग्रेसपक्ष सोडून सर्वच राजकीय पक्षांचा महाराष्ट्रातील आर्थिक आधार आहे. काँग्रेसमध्ये ही विलासराव देशमुख, सुशिल कुमार qशदे या दोघांचे आर्थिक आणि व्ययक्तिक मित्र अविनाश भोसले हेच आहेत.
अविनाश भोसले यांच्याशी पंगा घेउन अशोक चव्हाणांनी एका झटक्यात कीती शत्रु निर्माण केले आहेत यांची कल्पना यावरुन येते.
अविनाश भोसले यांच्याविरुध्द दोन वर्षांपूर्वी एअरपोर्टवर परवानगी पेक्षा जास्त qकमतीच्या वस्तू ग्रीन चॅनलमधून आणल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आणि अविनाश भोसले हे नाव निगेटीव प्रसिध्दीच्या झोतात आले.
सर्व मोठे उद्योगपती एक चूक हमखास करतात तीच चूक अविनाश भोसले यांनी एअरपोर्टवर केली. अविनाश भोसले यांच्या प्रमाणेच एअरपोर्टवर एखाद्या हवालदारांशी गोडपणे न बोलता हुज्जत घातल्याने अडचणीत आलेल्या बड्या उद्योगपतींची संख्या मोठी आहे.
अलिकडेच मफतलाल ग्रुप या काही हजार कोटींच्या उद्योग समुहाच्या एक डायरेक्टर शितल मफतलाल यांना अठ्ठावीस लाख रुपयांची डायमंडची रिंग आणताना एअरपोर्टवर पकडले वास्तवीक बड्या लोकांच्या हातातल्या अंगठ्या काहीवेळा कित्येक कोटी रुपयांच्या असतात. शितल मफतलाल यांनी ही अंगठी लंडनमध्ये विकत घेतली. त्यांच्यावर तिथले टॅक्स भरले ते टॅक्स भरल्यामुळे भारतात त्यावर टॅकस भरण्याची गरज नाही असे सर्टिकीकेट ही घेतले. वास्तवीक ही अंगठी त्या जर हातात घालून आल्या असत्या तर त्यांना कोणी विचारले देखील नसते परंतु ओव्हर कॉन्फीडन्स मध्ये त्यांनी ती अंगठी लगेजमध्ये ठेवली आणि त्यावर टॅक्स देण्याची गरज नाही या कल्पनेत त्या ग्रीन चॅनल मधून बाहेर पडू लागल्या.
नेमकी ही अंगठी ग्रीन  चॅनलच्या एक्स-रे मशीनमध्ये लोकेट झाली. कस्टम ऑफीसरने त्याबाबत विचारले असता शितल मफतलाल यांनी त्याला नम्रपणे आपली चूक झाल्याचे कबूल करायला हवे होते. कारण अठ्ठावीस लाखांची ही अंगठी ग्रीन चॅनलमधून न नेता त्यांनी टॅक्स भरल्याची कागदपत्रे दाखवून रेड चॅनल मधून नेली असती तर एक नवा पैसाही टॅक्स न भरता ते कायदेशीर झाले असते. पण मी उद्योगपती आहे. ही हवा डोक्यात असल्याने, माझे कोण काय बिघडवणार हा दर्प मनात असल्याने कारण नसताना त्या ग्रीन चॅनल मधून बाहेर पडल्यावर त्यांनी वाद घातला.
कस्टम, पोलीस या खात्यातला हवालदार असे कि अधिकारी त्यांच्या हातात कायदा असतो. त्या कायद्याचा अहंकार त्यांच्या डोक्यात असतो. बडी माणसे आपल्याला कायद्याचा हा अधिकार असून देखील तुच्छ कसपटा समान लेखतात. याचा एक राग, असुया, मत्सर त्यांच्या मनात असतो. त्यामुळे माणूस जेवढा मोठा तेवढा त्याला अपमानीत करण्याचा उत्साह या लोकांच्या मनात अधिक असतो. शितल मफतलाल यांनी वाद घातल्याने त्यांना अटक झाली. मफतलाल साम्राज्यांची ही डायरेक्टर  बारा तास पोलीस कस्टडीत राहीली आणि दुसèया दिवशी फेरा कोर्टातुन जमिन मिळवण्यासाठी पन्नास लाखांहून अधिक खर्च करुन ती जामीनावर सुटली म्हणजे डोक्यात असलेली हवा तीला केवढ्यावर पडली?
महिनाभरापूर्वी qकगफीशरचे मालक विजय माल्ल्या यांच्या बाबतही असाच प्रकार घडला ते विमान कंपनीचे मालक असले तरी कायद्याने त्यांना सिक्युरीटी चेक करणे आवश्यक आहे. काही वेळा सौजन्य म्हणून त्यांना सिक्युरीटा यंत्रणा व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट देते. चेक न करता विमानात जाउन बसायची त्यांना इतकी सवय झाली आहे की, त्यांना विजय मल्ल्या म्हणून न ओळखणाèया एअरपोर्ट वरील सिक्युरीटी गाईडसने चेक करण्याचा पवित्रा घेतला तेव्हा त्यांना राग अनावर झाला. मी विजय मल्ल्या आहे. माझी तपासणी करताच कशी? असे म्हणून त्यांनी सिक्युरीटीशी वाद घातल. त्यांना तुच्छ लेखून शिवीगाळ केली त्यामुळे त्या हवालदारांचा अहंकार आणि प्रतिष्ठा दुखावली त्यांनी चेक केल्याशिवाय सोडणार नाही अशी भूमिका घेतली. दुर्दैवाने या चेकमध्ये त्यांच्या बँगेत रिव्हॉलवरची काडतुसे निघाली विमानात काडतुसे न्यायला परवानगी नसते त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
अविनाश भोसले त्यांच्या बाबत गाजावाजा झालेली केस अशीच आहे. लक्षात घ्या की जे आकडे ऐकल्यामुळे आपले डोळे विस्फारतात ते आकडे उद्योगपतींसाठी किरकोळी असतात उद्या तुमच्याकडे हजार पाचशे रुपयांचे नोट सापडली आणि तुमचे मासीक उत्पन्न दहा-वीस हजार रुपये असेल तर ते जीतके स्वाभावीक आहे. तितकेच पंचीवीस ते पन्नास हजार कोटींची उलाढाल असणाèया उद्योगपतींकडे पाच पंचवीस कोटी रुपयांची जी वस्तू सापडणे स्वाभाविक आहे. अविनाश भोसले यांच्यासारखे उद्योगपती qकवा राजकारणी जेव्हा परदेशात जातात तेव्हा कोट्यावधींची घड्याळे स्टोन्स, डायमंन्डस हौशीने खरेदी करतात. आमच्या परिचयातील एका आमदाराने आपल्या जगभराच्या दौèयात वेगवेगळ्या प्रकारची फाउंडटन पेन्स जमा केली आहेत त्यांची qकमत पाच कोटी रुपये आहे. आज साधे मोबाईल जर त्यावर डायमंड असतील तर परदेशात वीस ते पंचीवीस लाखांमध्ये सर्रास मिळतात. मंत्री आणि त्यांच्या फॅमीली हल्ली वर्षांतून चार वेळा परदेश दौरे करतात. दरवेळी कोट्यावधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू घेवुन येतात पण त्यांची चर्चा वाच्यता होत नाही नाही ते कधी पकडले जात नाही. पकडले जात नाहीत कारण व्हीआयपी येण्याआधीच त्यांना रिसीव्ह करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे वरीष्ट अधिकारी थेट विमानापर्यंत जाउन उभे राहतात. व्हीआयपींचे लगेज एअरपोर्ट वरील पोलिसांच्याच गाडीत भरुन वीदाउट चेक बंगल्यावर रवाना होते आणि व्हीआयपी रिकाम्या हाताने ग्रीन चॅनलमधून राजरोसपणे बाहेर पडतात. इतरांचे सोडा खुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण परदेशातुन येतात तेव्हा त्यांचे लगेजही कस्टमच्या स्क्रुटीनीतुन येत नाही तर थेट एस्कॉर्ट गाड्यांनेच टाकले जाते.
अविनाश भोसले महिन्याचे वीस दिवस जगभर फीरत असतात यापूर्वी ते शेकडो वेळा विविध वस्तू आपल्या शौकीन स्वभावानुसार घेवून आले आहेत. घडयाळांचा त्यांना शौक आहे. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी त्यांनी लंडन येथे दोन अडीच कोटी रुपयांची घड्याळे आपल्या व्ययक्तीक वापराकरता एअरपोर्टवरील डयुटी फ्री शॉपमध्ये विकत घेतली. त्याच्यासोबत त्यांना भारतात गेल्यावर डबल डयुटी पडू नये म्हणून आवश्यक त्या डीमांड नोट्सही दिल्या गेल्या.
पण अविनाश भोसले यांनी डोक्यांत हवा गेलेले उद्योगपती जे करतात ते केले. रेड चॅनलवर जावून कागदपत्र दाखवून एकही नवा पैसा न भरता ते सुखरुप बाहेर पडले असते त्याऐवजी स्टाईलमध्ये ते ग्रीन चॅनलमधून बाहेर पडू लागले कस्टम ऑफीसरने घड्याळाबाबत विचारणा केली असता त्याला शांतपणे सौजन्याने आपली कागदपत्रे दाखवण्याऐवजी मी कोण आहे हे ठाउक आहे का तुला, मला अडवण्याची तुझी qहमतच कशी झाली. मी मुख्यमंत्र्यांचा मित्र आहे असा वाद घालायला सुरवात केली या अपमानाने संतापलेल्या कस्टम अधिकाèयाने त्यांना धडा शिकवायचे ठरवले त्यांना फेरा कायद्याचे उलंघन केल्याच्या आरोपाखाली अटक केली. अविनाश भोसल्यांना अटक झाल्याचे कळताच त्यांचे सव्र राजकीय मित्र कामाला लागले. रात्रीच्या मॅजीस्टेट समोर त्यांना उभे करण्याचा आदेश आला. रात्रीच्या स्पेशल मेजीस्टेटने दोन मीनिटांत त्यांची बॉन्डवर सुटका केली.
पण प्रकारण एवढ्यावरच थांबले नाही अपमान झालेला तो कस्टम अधिकारी सुडाच्या भावनेने पेटला होता. त्याने मीडीयाला फोन करुन झाला प्रकार लीक केला परिणामी न्यूज पेपर्स आणि चॅनल्सनी अविनाश भोसल्यांना लगचे जामीन कसा मिळाला असा प्रश्न उभा करुन त्यांची पाठराखण करणाèया नेत्यांना झोडपून काढायला सुरवात केली. राजकारणाात कुणीही कीतीही मित्र असले तरी बीरबलाच्या कथेतील माकडीन आणि तीचे पिल्लू ही गोष्ट कायम खरी असते. राजकारण्याला जर आपल्या नाका तोंडात पाणी जाण्याचा धोका वाटला तर तो आपल्या आश्रीताला लगेच पाया खाली घेतो. अविनाश भोसले यांचा जामीन हाय कोर्टात त्यांना जामीन मिळाला पण मधल्या काळात वृत्तपत्रांनी त्यांची यथेच्छ बदनामी केली.
विशेष म्हणजे अविनाश भोसले यांच्या बदनामीत मराठी पत्रकार आघाडीवर होते. याचे कारण मराठी पत्रकारांना मराठी माणूस श्रीमंत झालेला पहावत नाही. यशस्वी झालेला सहन होत नाही. स्वत: पाच पंचवीस हजारात पत्रकारीतेच्या नावाखाली कारकुनी करणाèया पत्रकारांना मराठी माणसाच्या वैभवाचे करोड अब्जचे आकडे ऐकून पोटात मुरडा होउ लागतो. आम्ही भिकारी आहोत, आम्ही भिकारीच राहणार पण तुम्ही श्रीमंत होता म्हणजे काय? या वीकृतीने बहुसंख्य पत्रकार पछाडलेले असतात.
या पत्रकारांना अंबानीने कायदा धाब्यावर बसवून उल्टे-पाल्टे उद्योग केलेले चालतात. त्याचे गोडवे आणि पोवाडे गाण्यात ही मराठी वृत्तपत्रे आघाडीवर असतात. मराठी उद्योगपतींनी अंबानींचा आदर्श ठेवावा असा सल्ला देणारे मराठी संपादक एखादा मराठी उद्योगपती अंबानी स्टाईलने व्यवहार करु लागला की, त्याला की ती आणि कसा झोडपू याचाच फक्त की चार करतात.
जोवर मराठी पत्रकारांची दळभद्री वृत्ती आणि संपादकांचा कर्म दरिद्रीपणा सुटत नाही तोवर मराठी उद्योगपतींना अंबानींना असलेले ग्लॅमर मिळने अवघड आहे. पुन्हा या पत्रकार, संपादकांचा डबल गेम असा की एकीकडे ते पैसे वाल्यांबाबत त्यांनी एवढा पैसा कोठून मिळाला, कायदेशीर मार्गाने लाखो करोडो रुपये मिळत नाहीत असे प्रश्न विचारुन संशयाचे वातारवण निर्माण करतील बिल्र्डरला बदनाम करण्याची एकही संधी सोडणार नाहीत व्यापाèयाला नफेखोर, समाज कंटक म्हणूनच प्रोजेक्ट करतील मराठी नगरसेवक आमदारांना भ्रष्ट ठरवण्यासाठी रकानेच्या रकाने रखडतील पण जाहीराती आणि देणग्यांची भीक मागायला मात्र याच पैसे वाल्यांच्या दारात भिकाèयांसारखे घुटमळत राहतील. मराठी वर्तमान पत्रांच्या वर्धापन दिनाला प्रसिध्द होणाèया पुरवण्या वर्षभर ज्यांची qनदा नालस्ती केली त्याच नगरसेवक आणि बिल्डरांच्या जाहीराती दिसतात यावरुन मराठी वृत्तपत्रांचा दुटप्पीपणा दिसतो.
स्वत: संपादक राजकारण्यांपुढे वेगवेगळ्या कारणांसाठी गुडघे टेकताना दिसतात. आजकाल अनेक बडया वृत्तपत्र समुहांचे मालक संपादकाला आपला पीआरवो समजातात. सरकारी कोटयातुन भूखंड मीळवण्यापासून ऑफीसातली बेकायदेशीर बांधकामे वाचवण्यापासून जाहीरातील, लायसंन्स, परमीटे मिळवण्यापर्यंत सर्व कामे संपादकाने करावी अशीच मालकांची अपेक्षा आणि अट असते. यासाठी अलिकडे अनेक वर्तमान पत्रांचे मालक चांगले अग्रलेख लिहणाèया पत्रकारांपेक्षा चांगली पीआरवो गीरी करणाèया माणसाला संपादक म्हणून नेमतात.
अविनाश भोसले यांना नडले ते मुख्यत: मराठी संपादक हेच ते संपादक ज्यांना ज्यांना राज्यसभेची खाजदारकी असते qकवा स्वत:च्या नातेवाईकांसाठी मुख्यमंत्री कोट्यातुन फ्लॅट हवे असतात. त्यासाठी मंत्र्यांची मेत्री ही असते. मुंबईतले अनेक संपादक आपण अमु मंत्र्यांचे qकवा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आहोत असा दावा उघडपणे करीत असतात. संपादकाने मंत्र्यांशी मैत्री केली तर ती मैत्री पण उद्योगपती बिल्डरने केली तर ती मात्र चमचेगीरी qकवा वशीलेबाजी असा विचित्र न्याय या संपादकांचा असतो. अविनाश भोसले यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी एअरपोर्टवर त्यांच्याकडे असलेले योग्य कागदपत्र न दाखवता उध्दतपणाने कस्टम अधिकाèयाचा अपमान केला पण वर्तमान पत्रांनी जी शिक्षा त्यांना दिली ती मात्र शरद पवार, अजित पवार, विलासराव देशमुख, सुशील कुमार, ठाकरे फॅमीली, गडकरी मुंडे यांच्याबरोबर असलेल्या दोस्तीची.
पुन्हा वर्तमानपत्रांचा हलकटपणाा असा की, अविनाश भोसले यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे याचा उल्लेख त्यांनी जणू काही त्यांच्या काहीतरी अनैतीक, बेकायदेशीर वस्तू आहे. अशाप्रकारे केला पण हे हेलिकॉप्टर सर्रास वापरणाèया वरिलपैकी कोणात्याही राजकारण्याला दोष दिला नाही. अर्थात कस्टमचे ते प्रकरण आता कोर्टात आहे. खालच्या कोर्टाने दंड भरुन हे प्रकरण मिटवता येईल असे संकेत दिले आहेत. त्यामुळे असे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्याप्रकरणात अविनाश भोसले सुटल्यात जमा आहेत.
सिडको मधील हॉटेल भूखंड प्रकरणात अशोक चव्हाणांनी विलास रावांचा सूड घेण्यासाठी अविनाश भोसले यांना बळीचा बकरा बनवले आहे. असेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. वास्तवीक अविनाश भोसलेंनी जे काही फेरबदल न्यूज ऑफ लॅन्ड मध्ये करुन घेतले त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्यांनी केला आहे असे म्हणता येणार नाही. हा भूखंड सिडकोचा आहे. सिडकोने अधिकृतरीत्या टेंडर  मागवून त्याचा जाहीर लिलाव केला या लिलावात देशातील परदेशातील बारा नामवंत हॉटेल्सनी आपली बोली बोलली. यात अविनाश भोसले यांची बोली सर्वाधिक ठरली आणि त्यांना हा फ्लॉट सिडकोने दिला. यात गैर काय आहे?
सिडकोने दिलेला प्लॉट, हॉटेल करता म्हणून जरी दिला असला तरी त्यामध्ये यूज ऑफ लॅण्ड बदलण्याचा अधिकार सिडकोला अधिकृतपणे आहे. यापूर्वी शेकडो प्रकरणाात जमिनीचा वापर करण्याचे कारण नंतर बदलण्यात आले आहे. जर तेव्हा त्याला स्थगिती दिली गेली नाही तर आता तो फ्लॉट केवळ अविनाश भोसल्यांचा आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणे कीतपत योग्य आहे?
मुंबईत दादरला असलेला कोहीनूर मीलचा फ्लॉट मनोहर जोशी आणि राज ठाकरे यांनी मिळून एनआरसीकडून साडेचारशे कोटींना वीकत घेतला नंतर दोन वर्षांनी तोच फ्लॉट एक बील्र्डरला अधिकृतपणे साडेसहाशे कोटींना विकला. याचा अर्थ मधल्या मध्ये मनोहर जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांनी साठ कोटी रुपयांप्रमाणे एकशे एेंशी कोटी रुपये मिळाले एकशे एेंशी कोटी रुपये कमावणाèया मातोश्री कंपनीने सरकारला टॅक्स म्हणून वीस कोटी भरले. त्यावेळी हा प्रश्न कोणी उपस्थित केला नाही की राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला आणि सरकारला फक्त वीसच कोटी रुपये देवून जोशी, ठाकरे, शिरोडकरांनी एकशे एेंशी कोटी रुपये कसे काय मिळवले?
मी सरकार कडून विकत घेतलेली वस्तू नंतर कीती रुपयांना विकतो. हा माझ्या व्यापारी कौशल्याचा भाग आहे. माझे कर्तव्य आहे की माझ्या वीक्रीवरचे सर्व टॅक्सनी योग्यप्रकारे देणे. अविनाश भोसले यांनी दोनशे सत्याएेंशी कोटींना घेतलेला बारा एकरांचा फ्लॉट सिडकोकडे रितसर अर्ज करुन त्यांच्या परवानगीने आणि एक कोटी रुपये त्याबद्दल रितसर भरुन त्यातले सहा एकर दुसèया बिल्डरला दोनशे पंच्याएेंशी कोटींना विकून अडीचशे कोटींचा नफा मिळवला यात अनैतीक qकवा बेकायदेशीर असे काहीही नाही. ज्या गील यांनी सिडकोचे मॅनजींग डायरेक्टर म्हणून हा प्रस्ताव सिडकोच्या डायरेक्टर बोर्डापुढे मांडला ते गील साहेब एक कार्यक्षम, चारित्र्यसंपन्न, स्वच्छ हाताचे निपृट अधिकारी म्हणून प्रसिध्द होते. अशोक चव्हाणांनी गील साहेबांनी निवृत्त होण्यापूर्वी सहा महिने अधि घेतलेल्या सर्वच निर्णयांना स्थगिती देवून गील साहेबांवर जो अविश्वास दाखवला आहे त्याची प्रतिक्रिया आय ए एस अधिकाèयांमध्ये निश्चितच चांगली होणार नाही. अशोक चव्हाण डांग्यांसारख्या बदनाम आणि अधिकाèयाला अनेक आक्षेप डावलून महाराष्ट्राचे मुख्
य सचिव करतात आणि गील सारख्या स्वच्छ अधिकाèयावर qशतोडे उडवतात यावरुन अशोक चव्हाणांनी आवड आणि निवड दिसुन येते.
सिडको भूखंड प्रकरणात अविनाश भोसले यांनी ज्या पार्टीला सहा एकरचा भूखंड रेसिडेन्सील कॉम्पेस्कसाठी विकला आहे. ती पार्टी अपीलात हायकोर्टात जाणार यात शंका नाही. सिडकोने अधिकृतपणे मान्यता दिल्यानंतर कायदेशीरपणे केलेल्या व्यहवाराला मुख्यमंत्री जर राजकीय द्वेशा पोटी आणि सुडबुध्दीने स्टे देणार असतील तर त्यांचा हायकोर्टात कचरा झाल्याशिवाय राहणार नाही.
नवी मुंबईचा एअरपोर्ट कधी होईल हे आता सांगता येत नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी इतके आक्षेप या विमान तळाला घेतले आहेत की त्यांचे निराकरण करुन हा विमानतळ व्हायला अजुन पाच दहावर्षे लागू शकतील सरकार कीतीही मुर्ख आणि दृष्ट असले तरी अडीचशे कोटीची इनव्हेस्टमेंट फ्लॉटसाठी आणि तेवढीच हॉटेल्ससाठी करणाèया संस्थेने पाचशे कोटीवरील व्याज बेमुदत भरत रहावे अशी अपेक्षा ते करु शकत नाही. अविनाश भोसले यांनी हॉटेल फ्लॉटसाठी भरलेल्या दोनशे सत्त्याएेंशी कोटींच्या रकमेवरील रोजचे व्याज जरी विचारात घेतले तरी त्यांनी घेतलेली सहा एकर जमीन विकून टाकण्याचा निर्णय हा अत्यंत व्यवहार्य आहे हेच मान्य करावे लागेल.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता सुडाचे राजकारण सुरु केलेले दिसते. सुडाची सुड जरी अशोक रावांनी पेटवलेली असली तरी तीच्या ज्वाला आज ना उद्या अशोक रावांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची पर्यंत येवून पोहचल्याशिवाय राहणार नाहीत एवढे त्यांनी समजून घ्यावे हे बरे.
अभिजीत राणे

No comments:

Post a Comment